पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथील ताम्हाणेवस्ती व म्हेञेवस्ती परिसरात नवीन अंगणवाडी सुरू करण्यात यावी,अशी मागणी शिवसेना भोसरी विधानसभेचे उपविभागप्रमुख कु.प्रविण धोंडाप्पा पाटील यांनी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी,उपायुक्त श्री.दिलीप हिवराळे साहेब यांच्याकडे करण्यात आली.समवेत विभागप्रमुख श्री.सतिश मरळ व युवासेना अधिकारी कु.अभिषेक काळे उपस्थित होते.
महिला व बालविकास प्रकल्प शहरी अंतर्गत राबवण्यात येणारी एकात्मिक बाल विकास योजना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येते,परंतु चिखली भागात लोकसंख्या वाढून सुध्दा या ठिकाणी नवीन अंगणवाडी सुरू करण्यात आल्या नाहीत
या योजनेचा ६ महिने ते ३ वर्षे पर्यंतच्या बालकांना राष्ट्रीय धोरणाप्रमाणे पूरक पोषण आहार,लसीकरण,आरोग्य तपासणी व शालेय पूर्वक शिक्षण या गोष्टी पासून वंचित रहावे लागत आहे, हीच गरज लक्षात घेऊन आपण शासनाकडून याठिकाणी नवीन अंगणवाडी सुरू करावी याद्वारे बालमृत्यू,शारिरीक अंपगत्व,कुपोषण, शैक्षणिक नुकसान यावर मात करू शकतो,याविषयी हिवराळे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.