पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला आणखी गती देणारा अर्थसंकल्प – अमित गोरखे

0
313

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा एकूण ७ हजार १२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह सादर केला. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रशासनाने शहराच्या विकासाला आणखी गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतो आहे.

कोणतीही करवाढ करणार नसल्याची प्रशासनाने घेतलेली भूमिका स्वागतार्ह असून शहरातील नागरिकांना दिलासा देणारी ही बाब आहे. मोशीतील प्रस्तावित 850 खाटांचे रुग्णालय, अण्णासाहेब मगर स्टेडियम पुर्नविकास, शहरात विविध इलेक्ट्रीक चार्जिग स्टेशन, बीआरटी रस्त्यांचे सुशोभिकरण, चिंचवड येथील सिटी सेंटर, नवीन महापालिका भवन, नदी सुधारसारख्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात आयुक्तामार्फत करण्यात आली. मागील पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेल्या विकासाला आणखी गती या अर्थसंकल्पातील योजना व प्रकल्पांमुळे मिळणार आहे.