पिंपरी चिंचवड शहराच्या जडण-घडणीत सहभागी आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान

0
461

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहराचे ग्रामपंचायत, नगरपालिका ते महापालिका जडण-घडणमध्ये शहराला महत्वपुर्ण योगदान देणार्या आजी- माजी सरपंच, नगराध्यक्ष, महापौर व पोलिस पाटील व त्यांच्या कुटूंबियांचा माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, प्रमुख मार्गदर्शक प्रकाशराव मीठभाकरे उपस्थित होते.

तसेच, देश स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणा-या आणि स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणा-या स्वातंत्र्य सैनिक व कुटुंबियांचा देखील सन्मान करण्यात आला. नागरिकांच्या मनात देश प्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी आणि देशाचा जाज्वल्य इतिहास पुढ़च्या पिढ़ीला स्मरण राहुन प्रेरित व्हावा, या उददेशाने “क्रांतीविर चापेकर नगर” येथे ३०० पेक्षा अधिक महान क्रांतीकारकांचे चित्रप्रदर्शन व माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले होते.

यानिमित्त, मधुकर भोंडवे, कविचंद भाट, बबनराव चिंचवडे, सुभाष चिंचवडे, उषा उर्फ माई ढोरे, उर्मिला काळभोर आदी आजी माजी पदाधिकारी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. स्वातंत्र्यवीर चापेकर नगर, स्पाईन रोड, चिंचवडे नगर (जुने रावजी गार्डन) याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, स्वातंत्र्य सेनानी, गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी, आणीबाणीतील सत्याग्रही अथवा त्यांचे कुटूंबीय तसेच १९४७ साली स्वातंत्र्य दिवस पाहिलेले नागरिक यांचा सन्मान सोहळा पार पडला.

माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, महिला मोर्चाच्या पल्लवी वाल्हेकर, मनोज तोरडमल, योगेश चिंचवडे, जनार्दन वाठरकर, प्रभाग अध्यक्ष भगवान निकम, बिभीषण चौधरी, कामगार आघाडी धिरज धाकड, प्रदीप पटेल, सचिन महाले, नवनाथ वाघमारे, संदीप महाजन, कैलास रोटे, रविंद्र कुवर, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.

१९७५ आणीबाणीत सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी, गोवा मुक्ती मोर्चातील सनिक व कुटुंबीयांचा सत्कार देखील या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. सुत्रसंचालन दिग्दर्शक व अभिनेता अविनाश आवटे यांनी केले.