पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचा दावा…मध्यवर्ती कार्यालयात बहुमताने ठराव पारित… अजितदादांकडे केली मागणी…

0
3

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मासिक बैठकीमध्ये रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी आमदार आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची मासिक बैठक मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती.
बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तीनही मतदार संघ येतात त्यापैकी पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीच्या कोट्यातील अधिकृत उमेदवार संघ आहे तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढणार आहे. त्या व्यतिरिक्त भोसरी व चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ चिंचवड व भोसरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाव्या असा ठराव पक्षाच्या मासिक सभेमध्ये शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी अनुमोदन दिले आहे.

यावेळी आमदार आण्णा बनसोडे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, महिला अध्यक्षा प्रा.कविताताई आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, ज्ञानेश्वर कांबळे, गोरक्षनाथ पाषाणकर, निलेश पांढारकर, बन्सी पारडे, वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, सेवादल अध्यक्ष महेश झपके, सचिन औटे, सहकार सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, आदिवासी सेल अध्यक्ष विष्णू शेळके, युवक पिंपरी विधानसभा अध्यक्ष अक्षय माछरे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, व्हीजेएनटी अध्यक्ष राजू लोखंडे,लिगल सेल अध्यक्ष संजय दातीर, ग्राहक कल्याण सेल अध्यक्षा पल्लवी पांढरे, लता ओव्हाळ, महिला कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, मिरा कदम, उपाध्यक्ष विजय दळवी, तुकाराम बजबळकर, अरूण पवार, गोरोबा गुजर, रविंद्र सोनवणे, हर्षल मोरे, बाळासाहेब पिल्लेवार, राजीव क्षीरसागर, राजेंद्रसिंग वालिया, सरचिटणीस राजू चांदणे, अविनाश शेरेकर, स्वराज शिंदे, महेश माने, कुमार कांबळे, विजया काटे, यश बोध, रामकिसन माने, मिरा कांबळे, विनय शिंदे, जयश्री लांडगे, रमेश कांबळे, आशिष कांबळे, विक्रम पवार, रशिद सय्यद, ॲड शंकर पल्ले, विजय पांढारकर, दिलीप सरवदे, निलम कदम, देवी थोरात, सचिन वाल्हेकर, क्षमा सय्यद, सुजाता पांडे, राकेश गुरव, महेश ताकवणे, करण वाघ, सुनिल आडागळे, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे इत्यादींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.