पिंपरी चिंचवड रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
38

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पिंपरी येथील पुतळ्यास सकाळी ११ वाजता दरम्यान पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोदजी बन्सल, प्रांत गतिविधी संयोजक हेमंतराव हरहरे, समरसता विभागाचे मुकुंदजी येरमाळे, श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी विश्वस्त अनिलजी सौंदाडे, समरसता विभागाचे विलासराव लांडगे, प्रदीप पाटील, सुहास देशपांडे यांचेसह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.