पिंपरी चिंचवड महापौर निवड शुक्रवारीकाटे, कलाटे, कस्पटे, शिंदे, लांडगेंची नावे चर्चेत

0
5

पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त यांनी आज जाहीर केला आहे. शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, राहुल कलाटे, शितल शिंदे आणि नितीन लांडगे ही नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत. भाजप धक्कातंत्राचा वापर कऱणार आणि आयत्यावेळी मंदार देशपांडे यांच्यासारखा अत्यंत नवखा चेहरासुध्दा महापौर म्हणून पुढे येऊ शकतो, असेही सांगितले जाते. दरम्यान, भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली बैठक आज सायंकाळी किंवा उद्या रविवारी होणार असून त्यावेळी गटनेता निवड होईल, असे शहराध्यक्ष काटे यांनी सांगितले,

पिंपरी चिंचवडचा महापौर येत्या शुक्रवारी म्हणजे ६ फेब्रुवारीला खुर्चीवर विराजमान होणार आहे. आता आज या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 2 फेब्रुवारीच्या दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान, दाखल करायचे आहेत. मग 6 फेब्रुवारीच्या सकाळी 11 वाजता सर्व साधारण सभा होईल. या सभेत महापौर आणि उपमहापौर पदावर शिक्कामोर्तब होईल.

२०१७ मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील नितीन काळजे यांना प्रथम संधी मिळाली आणि दुसरा मान राहुल जाधव यांना मिळाला होता. आमदार महेश लांडगे यांचे समर्थक अशी त्यांची ओळख होती. नंतर पुढील अडिच वर्षे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांपैकी सर्वात जेष्ठ म्हणून चिंचवड विधानसभेतील माई ढोरे यांना संधी मिळाली होती.