पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या सुप्रिया चांदगुडेसुध्दा बिनविरोध

0
69

दि.०२(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महापालिकेत यावेळी रवी लांडगे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आणि पाठोपाठ मोरवाडी प्रभाग क्रमांक १० मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपच्या माजी नगरसेविका सुप्रिया चांगदुडे यांची निवड झाली आहे.

वर्षा दत्तात्रेय भालेराव यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी होती. त्यांच्यासह आणखी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने चांदगुडे यांची निवड झाली आहे. भाजपने सलग दुसरी जागा बिनविरोध करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे.दरम्य़ान, राज्यात कालपर्यंत २२ जागा बिनविरोध कऱण्यात आल्या असून त्यात भाजपच्या १२, शिंदेंच्या शिवसेनेच्या ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेचा समावेश आहे.