दि.२५(पीसीबी) – थोर समाजसुधारक दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधान परिषद सदस्य उमा खापरे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापू गायकवाड, सुनील पवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी स्वीकृत प्रभाग सदस्या वैशाली खाडे तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचविण्याची संकल्पना मांडली होती म्हणून शासनाच्या वतीने त्यांचा जन्मदिवस ‘ अंत्योदय दिवस, म्हणून साजरा करते. “अंत्योदय” ही त्यांची विचारधारा आजही शासनाच्या विविध योजनांना दिशा देत असून समाजकल्याणाच्या कार्यात प्रेरणादायी ठरत आहे. पंडित उपाध्याय यांच्या कार्यातून सामाजिक समता, सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्रनिष्ठा यांचे दर्शन घडते. त्यांचे जीवन तत्त्वज्ञान हे निस्वार्थ कार्य, साधेपणा आणि समाजसेवा या मूल्यांवर आधारलेले होते. त्यामुळे त्यांचे विचार आजच्या पिढीला मार्गदर्शन करणारे आहेत. .










































