पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्मार्ट पार्किंग प्रकल्प फक्त कागदावरच नागरिकांमधून नाराजीचा सूर

0
1

दि.१८(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्मार्ट पार्किंग प्रकल्प तुम्हाला दिसला का? लाभ घेतला का ?पिंपरी चिंचवड बुलेटिन न्यूज ने नागरिकांना हा प्रश्न विचारला होता त्यावर अनेक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समोर आलेल्या प्रतिक्रिया प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ठरल्या आहेत. अनेक नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना असा कोणताही प्रकल्प अस्तित्वात असल्याची माहितीच नाही. काहींनी हा प्रकल्प नेमका कुठे आहे, असा थेट सवाल केला; तर काहींनी तो केवळ कागदावरच असल्याचा आरोप केला. प्रशासनाने दिलेली आश्वासन हे खरंच पूर्ण करते का याचा यातून आढावा मिळाला . या सर्व प्रतिक्रियांमधून एक गोष्ट ठळकपणे समोर येते कि शहरातील सामान्य नागरिकांना स्मार्ट पार्किंग प्रकल्पाची ठोस माहिती देखिल नाही

पियुष दिनेश चतुर्वेदी यांनी म्हंटल आहे कि हे काय पीसीएमसी वाल्यांना या प्रकल्पाची माहिती सुद्धा नाहीये . तर आदित्य रोकडे यांनी हे भ्रष्टाचाराचा बचाव करण्याचं हे षडयंत्र असून पालिकेची १० वर्षांची श्वेतपत्रिका काढण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली आहे तर सारंग बेलसरे यांनी हा प्रकल्प कुठंय आणि रात्री घरी जाताना भीषण परिस्थिती असते आणि दोन्ही बाजूने गाड्या असल्यामुळे त्रास सहन करावा लागतो हे मत व्यक्त केलं . योगेश शहा यांनी म्हंटल आहे हा प्रकल्प स्काय वॉल्क सारखा असेल नागरिकांना पार्किंग करता येत नाही त्याला प्रशासन काय करणार अशी मिश्किल टिप्पणी केली आहे . सतिश काळे यांनी म्हंटल आहे कि चोरीला गेला असेल. राहुल मोरे यांनी पैसे खाऊन संपले पण शी प्रतिक्रिया व्यक्त केली . हेमंत आल्हाट यांनी असेल तर दिसेल असं म्हंटल आहे सुरेश रणसुभे यांनी कुठे आहे असा प्रश्न विचारला आहे . म्हणजे सामान्य नागरिकांना हा प्रकार काय आहे हेच माहिती नसल्याचं यातून समजतंय शहरातील नागरिकांना होणार त्रास समोर असताना सुद्धा प्रशासन गप्प का हा प्रश्न यानिमित्ताने समोर येताना दिसतोय .

नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो. शहरात वाढलेली ट्राफिक ची समस्या यावर सत्ताधारी कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही रस्त्यावर गाड्या लावल्याने नागरिक रस्त्याने चालताना त्रास सहन करावा लागतो यात अपघात होण्याची मोठी शक्यता असताना हि प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत मात्र आता शहरातील नागरिक मत मांडताना व्यक्त होताना दिसतात हि तितकीच कौतुकास्पद बाब आहे शहर झपाट्याने वाढत असताना नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था ही मूलभूत गरज बनली आहे. मात्र प्रकल्पांची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील तफावत नागरिकांच्या नाराजीचे मुख्य कारण ठरत आहे. आता नागरिक उघडपणे मत व्यक्त करत असून, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रत्यक्ष परिणामकारक उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर हा प्रश्न केवळ पार्किंगपुरता मर्यादित न राहता शहराच्या एकूण वाहतूक व्यवस्थेवरील विश्वासालाच तडा देऊ शकतो, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.