पिंपरी-चिंचवड महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनलीय; जयंत पाटील

0
171

शिवस्वराज्य यात्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्श

पिंपरी, दि. १० (पीसीबी)- नगरपरिषदा, महानगरपालिका नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून निर्माण झाल्या. मात्र सध्या जाणीवपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबविल्या जात आहेत. स्थानिक आमदार आपल्या सोयीने येथे अधिकारी आणतात. यातून मनमानी कारभार केला जातो. अशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड पालिकेचाही कारभार सुरू असून सध्याच्या घडीला पिंपरी चिंचवड पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत शुक्रवारी (दि. 9) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. यात्रा सध्या भोसरी पर्यंत पोहोचली असून भोसरीमध्ये यात्रेचे रूपांतर सभेत झाले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. सभेला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझमभाई पानसरे, मोहिनी लांडे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते रविकांत वर्पे, माजी नगरसेवक गिता मंचरकर, गणेश भोंडवे, धनंजय भालेकर, प्रविण भालेकर,संजय नेवाळे, पंकज भालेकर, समिर मासुळकर, सुधीर मुंगसे, तानाजी खाडे, देवेंद्र तायडे, विशाल काळभोर, ज्ञानेश आल्हाट, प्रदीप तापकीर, संजय उदावंत आदी उपस्थित होते.