पिंपरी चिंचवड महापलिकेच्या रिव्हर प्लॉगेथॉन स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ

0
6
  • आरोग्य विभागाकडून स्वच्छता जनजागृती मोहीम

पिंपरी,दि. 9 (पीसीबी) : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग “स्वच्छतेविषयी कायम जागरूक असतो. नदी हा आपला सांस्कृतिक वारसा. याच नद्याच्या आसपास असणाऱ्या घाट परिसर स्वच्छ असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला नदीच्या पावित्र्या बरोबरचं तिथला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आपण जपणे आवश्यक असते. याच उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून रविवारी म्हातोबा मंदिर, वाकड गावठाण घाट येथे “रिव्हर प्लॉगेथॉन” स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संकलित कचऱ्याचे सेग्रीगेशन करून त्याचे वजन अंदाजे ३ ते ४ टन कचरा गोळा करण्यात आला. या दरम्यान नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली. “कचरा मुक्त पिंपरी-चिंचवड” करण्यासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा, असे संदेश दिले गेले. “स्वच्छतेतूनच प्रगती साध्य होईल, चला आपण सर्वांनी स्वच्छतेचा संकल्प करून आपल्या शहराला कचरा मुक्त बनवूया,” असे आवाहन करण्यात आले.

नदी हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याच्या आसपासचा घाट परिसर असेल अथवा नदीच्या आसपासचा परिसर तो स्वच्छ रहावा म्हणून रिव्हर प्लॉगेथॉन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्याचप्रमाणे आपण शहरातील सर्व नदी घाट स्वच्छतेचे नियोजन केले आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून कचरा मुक्त पिंपरी-चिंचवड करण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे., असे आवाहन आयोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी केले आहे.