पिंपरी, दि. २६ नोव्हेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त २८ नोव्हेंबर रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदान (भिमसृष्टी) येथे होणाऱ्या या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, माजी नगर सदस्य, माजी नगरसदस्या तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या प्रबोधनात्मक कार्यक्रमामध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे जीवनचरित्र सांगणारे व्याख्यान, नाट्य आणि प्रबोधनात्मक गीते असे विविध कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भिमसृष्टी), पिंपरी
सायं. ४.०० वाजता
प्रबोधनात्मक गीत गायन
सादरकर्ते: सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे
….
सायं. ६.३० वाजता
व्याख्यान – विषय- महात्मा फुले यांचे शैक्षणिक धोरण आणि सामाजिक क्रांती
व्याख्याते: डॉ. सुखदेव थोरात, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग, भारत सरकार
….
सायं. ७.३० वाजता
प्रबोधनात्मक कार्यक्रम – जागर क्रांतिसूर्याचा
सादरकर्ते: शिरीष पवार, प्रवीण ढोणे, आबासाहेब आटखिळे, विक्रांत शिंदे व सहकारी
—————
उद्या २७ नोव्हेंबरला रंगणार संविधान जागर….
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिन (२६ नोव्हेंबर) निमित्त २६, २७ नोव्हेंबर रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या भारतीय लोकशाहीची ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय संविधानाचे महत्व सांगणारे व्याख्यान व नाट्य व गीते सादर होणार आहेत. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भिमसृष्टी) पिंपरी येथे होणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
————-
कार्यक्रमाचे वेळापत्रक
गुरुवार दि. २७ नोव्हेंबर
दु. ३.३० वाजता
प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम
सादरकर्ते – अशोक गायकवाड आणि स्वप्नील पवार
…
सायं. ५.०० वाजता
प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम
सादरकर्ते – सूर नवा ध्यास नवा फेम सुप्रसिद्ध गायक संतोष जोंधळे आणि सहकारी
…
सायं. ७.०० वाजता
प्रबोधनपर कार्यक्रम जागर संविधानाचा
सादरकर्ते – चंद्रकांत शिंदे, रेश्मा सोनवणे, राधा खुडे, अजय क्षीरसागर आणि सहकारी












































