पिंपरी-दि.10 (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत शंकर आण्णा गावडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील शंकर आण्णा गावडे यांच्या प्रतिमेस उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे,शंकर गावडे यांच्या पत्नी यामिनी गावडे,मुलगा शेखर गावडे,सून अपर्णा गावडे,नातू वेदांत गावडे,तसेच पदाधिकारी मनोज माछरे,नितीन समगीर, शिवाजी येळवंडे,सनी कदम, मंगेश कलापूरे, दत्तात्रय ढगे,ज्ञानेश्वर शिंदे,विश्वनाथ लांडगे,अनिल लखन, अभिषेक फुगे,युनुस पगडीवाले आदी उपस्थित होते.