पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ७२ तक्रार वजा सूचना प्राप्त

0
4

पिंपरी, दि . २८ महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७२ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.

      आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ७, ९ , ८, १४, ९, ४, ६,आणि १५ अशा एकूण ७२ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतुकीला होणारा अडथळा, शहरात ठिकठिकाणी पडणारा कचरा, पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, तुंबलेल्या गटारांची साफसफाई, जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सेवा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधाची पूर्तता, महापालिका दवाखान्यात नागरिकांना मिळणाऱ्या सेवा सुविधा, रस्त्यांवर वाढलेल्या भिकाऱ्यांची संख्या आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.