पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन…*

0
19

: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित ‘पुण्यश्लोक’ भव्य महानाट्य, महिलांसाठी कार्यक्रम, व्याखान यांचा समावेश..

पिंपरी, दि.२८ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन आले आहे. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे २९ व ३० मे रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उद्या (गुरुवार) दुपारी १२ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर,संत तुकारामनगर येथे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाला असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमा खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगर सदस्य,माजी नगरसदस्या तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वाभिमानी व आदर्श वाटचालीचे दर्शन घडवणारे ‘पुण्यश्लोक’ हे ६४ कलाकारांचे भव्य महानाट्य, महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोकोत्सव कार्यक्रम, लोकसंगीताचा कार्यक्रम, खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे यांचे व्याख्यान होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

————-
विचार प्रबोधन पर्वाचे वेळापत्रक

२९ मे
स्थळ- आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी
दु. १२ वा.
‘खेळ पैठणीचा’
खास महिला भगिनींसाठी कार्यक्रम

—-
सायं. ४ वा.
‘शाहिरी’
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित शाहीरीचा कार्यक्रम

—-
सायं. ६ वा.
‘पुण्यश्लोक’
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्वाभिमान व आदर्श
वाटचालीचे दर्शन घडवणारे महानाट्य

———-
३० मे स्थळ- आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी
दु. ३ वा.
‘लोकोत्सव’
महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन
(भूपाळी, वासुदेव, पिंगळा, वाघ्या, मुरली, धनगरी नृत्य,
शाहिरी पोवाडे, आदिवासी, डोंबारी नृत्य असे विविध कार्यक्रम,)

—–
सायं. ५ वा.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान
सुप्रसिद्ध व्याख्याते – नितीन बानगुडे पाटील

स्थळ- आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी
——–

३१ मे

सकाळी १०.३० वा.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बोधचिन्हाचे शासकीय पत्रव्यवहारात वापराबाबत अनावरण

स्थळ- महापालिका प्रशासकीय भवन
—–
सकाळी १०.४५ वा.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सांगवी
येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन

स्थळ – सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा पुतळा परिसर..
——
सकाळी ११.१५ वा.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते मोरवाडी
येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन

स्थळ- मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा परिसर
—-
दुपारी ४ वा.
लोकसंगीताचा कार्यक्रम
सादरकर्ते – समर्थ कला मंच सॉंग व ड्रामा

स्थळ- मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा
—————-