पिंपरी चिंचवड शहरात सध्या डेंग्यू चिकनगुन्याने थैमान घातले अनेक नागरिकांचा मृत्यू ही झाला आहे याचे गांभीर्य ओळखून नवी सांगवीतील समता नगर मध्ये डेंग्यू चिकनगुन्या होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती ह प्रभागाचे आरोग्य विभाग व सामाजिक संस्था एकत्र येऊन पत्रके वाटून ,प्रभोधन करून जनजागृती करत आहेत .यावेळी ह प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव ढवरी म्हणाले की कोणीही घाबरून जाऊ नये पण दक्षता मात्र घेतली पाहिजे आठवडातुन तुम्ही एक दिवस पालिकेच्या डेंगू मुक्त अभियानाला देऊन एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. डेंग्यू व चिकनगुन्याचा प्रसार एडीस एजिप्ताय नावाच्या डासामाफंत होतो. या डासाचे आयुष्य एक महिन्याचे असून तो 100 मीटर पण उडतो यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे व आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे ढवरी यांनी आवाहन केले.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने ही पत्रक वाटण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की मोठ्या पाण्याच्या टाक्याला घट्ट झाकण लावावे, कुलर, फ्रीजच्या खालच्या ट्रे मधील पाणी आठवड्यातून एकदा बदलावे, गच्चीवर भंगार, टायर ठेवू नये, घराभोवती डबके असतील तर ती बुजवावीत, तर तीव्र डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, अंगावर लालसर पुरळ येणे, तीव्र पोट दुखणे असे लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. भरपूर पाणी प्यावे, विश्रांती घेऊन ,आहारात केळीच्या फळाचा वापर करण्याचे आवाहन यावेळी जोगदंड यांनी जनजागृती करताना केले.
आरोग्य विभागाचे विनोद कांबळे म्हणाले की आम्ही घंटी गाडीत कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही आमचे आरोग्य कर्मचारी प्रबोधन करत असतात .
यावेळी पालिकेच्या ह प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव ढवरी, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड,आरोग्य मुकादम विनोद कांबळे,अरुण जगताप,आरोग्य सहाय्यक रामचंद्र शिंगाडे, आरोग्य कर्मचारी प्रवीण चव्हाण ,प्रमोद ढसाळ, कुणाल कांबळे,गणेश भंडारी, कचरा वाहक जयश्रीताई साळुंखे, कचरा वेचक जयश्री मस्के तसेच, सौ छाया कागजकर,अरविंद मांगले,गौतम जाधव,वसंतराव चकटे,आशा जाधव,मांगले अनुराधा, बेसिक टिमचे इनचार्ज धीरज फणसे, पवन रंधे, सुशांत साळवे, जयश्री आटणे,पुजा जाधव, रोहित सुरवसे,संतोष शेळके, आर्दश सुरवशे ,सागर देवकर, साहेबराव सुर्यवंशी, गणेश तारडे,मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.













































