पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासानाच्या दक्ष कारभारामुळे प्रभाग क्रमांक-१२ तळवडे-रुपीनगर श्रीराम कॉलनी मधील स्ट्रॉम वॉटर लाईन व (सी.डी वर्कचे) मोठ्या पुलाच्या व नाला रुंदीकरणाचा कामास प्रारंभ

0
124

दि.४ऑगस्ट (पीसीबी) – रुपीनगर-तळवडे 1997 साली महापालिकेमध्ये जाऊन ही या परिसरामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ज्योतिबानगर व रुपीनगर यामध्ये जो नाला आहे त्या नाल्यावर महापालिकेने करोडो रुपये खर्च करून सुद्धा या परिसरातील नागरिकांना योग्य प्रकारचे रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याकारणाने या परिसरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. सतत धार पावसामुळे या परिसरातील ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईन चोकअप झाल्या कारणाने हा परिसर परत एकदा पूर्णपणे जलमय झाला. त्यामुळे या परिसरामध्ये अनेक नागरिकांचा घरात पाण्याचे तळे साचले असून सर्व रस्ते पुन्हा जलमय झालेले चित्र दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील स्थापत्य विभाग त्याचप्रमाणे ड्रेनेज विभाग यांच्याशी मा.नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी संपर्क साधून जेसीबी उपलब्ध करून व या यंत्रणेचा वापर करून त्या परिसरातील जलमय झालेले रस्ते व नागरिकांच्या घरातील पाणी बाहेर काढण्यातस मदत केली.

२५ जुलै २०२४ रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी स्थापत्य विभाग ड्रेनेज विभाग यांना कायमस्वरूपी त्या परिसरातील अडचण दूर करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. ३० जुलै २०२४ रोजी आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे, मा.नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर, स्वी.नगरसेवक पांडुरंग भालेकर, भाजपाचे किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल भालेकर, अशोक कोकणे, शरद भालेकर, रामदास कुटे, रविराज शेतसंधी, अजय रासकर, कुणाल पाटील, रवी एकशिंगे, मच्छिंद्र शिंदे इत्यादींनी घटनास्थळी पाहणी केली त्या प्रसंगी स्ट्रॉम वॉटर लाईन टाकने व मोठा पूल बनविण्याचे व त्या परिसरामध्ये नाला वाढवण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या परंतु आज ४ ऑगस्ट २०२४ रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पुन्हा एकदा श्रीराम कॉलनी जलमय झाली, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज रोजी तत्काळ स्ट्रॉम वॉटर लाईनचे, मोठ्या पुलाचे (सी.डी.वर्कचे) व नाला रुंदी करण्याचे काम चालू करण्यात आले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.