पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुन्हा एकदा AA+ चे आर्थिक पत नामांकन

0
165

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुन्हा एकदा AA+ चे आर्थिक पत नामांकन मिळविले असून गेल्या तीन वर्षांपासून हे पत नामांकन स्थिर आहे. महापालिकेस मिळालेले हे नामांकन आर्थिक विवेक आणि स्थिरतेचा दाखला आहे. तसेच हे नामांकन महापालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे आणि २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीच्या मजबूत आर्थिक कामगिरीची तपशीलवार मूल्यांकनाची पुष्टी करते. आयुक्त शेखर सिंह म्हणाले, AA+ पत नामांकन महापालिकेच्या आर्थिक उत्कृष्टतेच्या आणि वचनबद्धतेची ओळख आहे.

महापालिकेस मिळालेले हे नामांकन महापालिकेचे सूक्ष्म आर्थिक व्यवस्थापन प्रतिबिंबित करते. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेस मिळालेले AA+ पत नामांकन हे वित्तीय जबाबदारी आणि पारदर्शकतेचा तसेच दृढ वचनबद्धतेचा पुरावा आहे.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेस AA+ पत नामांकन मिळत आहे. देशात खुप कमी महानगरपालिका आहेत ज्यांना AA+ नामांकन प्राप्त आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेस मिळालेले हे नामांकन केवळ आर्थिक सामर्थ्याचा पुरावा नाही तर गुंतवणूकदार, भागधारक तसेच नागरिकांनी महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.

हे पत नामांकन पालिकेच्या सातत्याने मजबूत आर्थिक कामगिरीला अधोरेखित करते, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी महापालिका एक विश्वासार्ह संस्था आणि इतर स्थानिक संस्थांसाठी एक आदर्श उदाहरण बनत आहे. महापालिकेचे पत नामांकन चांगले असल्यामुळे कर्ज तसेच म्युनिसिपल बॉण्डला अधिक प्रतिसाद मिळण्यास मदत होत आहे.

AA+ मजबूत पत नामांकनामुळे गुंतवणूकदारांचा महापालिकेवरचा विश्वास वाढेल. तसेच निधी उभारणीसाठी भांडवली बाजारात प्रवेश करण्याची महापालिकेची क्षमता वाढेल आणि उच्चभ्रू शहरी स्थानिक संस्थामध्ये विश्वासार्ह आणि आर्थिकदृष्ट्या जबाबदार संस्था म्हणून स्थान प्राप्त करेल.