पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ६ रुग्णालयांमध्ये NICU सुरु करा : चेतन गौतम बेंद्रे

0
288

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत ८ मुख्य रुग्णालय आहेत आणि २९ दवाखाने आहेत. शहराची लोकसंख्या २५ लाखाच्या वर पोहोचली आहे. लोकसंख्या च्या प्रमाणे शहरातील मनपा ची वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. मनपाच्या रुग्णालयात बाळंतपण विनामूल्य असल्याने अनेक गरीब व गरजू नागरिक या सर्व रुग्णालयांची वाट धरतात. त्यामुळे मनपा रुग्णालयाकडे नागरिकांचा लोंढा जास्त असतो.या सर्व मुख्य रुग्णालयांमध्ये प्रसूतीगृह आहेत परंतु फक्त यशवंतराव चव्हाण मेमोरियल (ycm) आणि आकुर्डी रुग्णालय मध्ये The Neonatal Intensive Care Unit (NICU) आहेत. उर्वरित ६ रुग्णालयांमध्ये NICU लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड चे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी नवनिर्वाचित आयुक्त शेखर सिंग यांना पत्र देऊन केली. या वेळेस प्रशासकीय कार्यप्रमुख यल्लपा वालदोर, सरोज कदम उपस्थित होत्या.

अनेक वेळा काही नवजात बालकांना जन्म झाल्यावर NICU ची गरज लागते. इतर रुग्णालयांमध्ये NICU नसल्यामुळे त्यांना यशवंतराव चव्हाण मेमोरियल (ycm) किंवा आकुर्डी रुग्णालय मध्ये हलवावे लागते आणि जागा उपलब्ध नसल्यास खाजगी रुग्णालयात घेऊन जावे लागते, आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांना त्याचा भार झेपत नाही.

खाजगी रुग्णालयात NICU विभागात एखाद्या शिशुला दाखल केल्यानंतर कमीत कमी ३० ते ८० हजार रुपये खर्च येतो. मनपा रुग्णालयात अत्यावश्यक सेवा सुविधा तज्ञ डॉक्टर्स,नर्सेस,आणि परिपूर्ण जीवनरक्षक प्रणाली सह पुरेसे अतिदक्षता कक्ष उपलब्ध नसल्यामुळे शिशु आणि माता यांचे उपचाराअभावी मृत्यू होतो.
मागच्या काही दिवसांपूर्वी याच कारणामुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि तालेरा रुग्णालय येथे नवजात शिशु आणि मातेचे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.