पिंपरी, दि. ३ –
नाशिक फाटा ते लांडेवाडी चौक राष्ट्रीय महामार्ग जवळपास 2.5 किलोमीटर परिसरातील प्लेगेथाँन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .उपायुक्त सचिन पवार यांच्या आदेशानुसार आभियान राबविण्यात आले.
ह प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान राबविण्यात आले .यावेळी ते म्हणाले की,आरोग्य विभाग व बेसिक्स टीमने विशेष जनजागृती स्वच्छता मोहीम गेल्या अनेक दिवसापासून राबवीत असून यापुढेही राबविण्यात येईल. आमच्या या अभियानात नागरिकांनी व संस्थांनी पण स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला त्यामध्ये विशेषता पुणे प्लॉगर्स, मानवी हक्क संरक्षण जागृती आणि इतर सामाजिक संस्थांनी सहभागी होऊन 3 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. यामध्ये प्लास्टिक सह बाटल्या घनकचरा मोठ्या प्रमाणात होता नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकू नये,आपल्याकडे येणाऱ्या घंटागाडीचे टाकण्याचे आवाहन मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांनी केले आहे.
यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की 100 दिवसाचा पालिकेने कृती आराखडा या उपक्रमात राज्यातील 22 महानगरपालिकेमधून आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पहिला क्रमांक मिळाला आहे .शहरवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.आपण या शहरातील नागरिक आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि यापुढे प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता अभियाना बरोबरच इतरही पालिकेच्या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे असे आवाहनही जोगदंड यांनी केले.
यावेळी ह प्रभागाचे क्षेत्रिय आधिकारी महेश वाघमोडे ,मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिंटे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड,आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे ,संदिप राठोड,सचिन जाधव,दिपक कोटियाना,नितीन तुपे हे आरोग्य निरीक्षक विकास शिरोळे ,गौरव गायकवाड,हे आरोग्य निरीक्षक उपस्थित होते तर पिं.ची.म.न.पा स्वच्छता ब्रांड अंम्बेसिटर आदिती निकम व सुरेशभाऊ डोळस,मिनाताई करंजावणे,विवेक गुरव (पुणे प्लॉगर्स फाउंडर),हरीश जैन (पुणे प्लॉगर्स)मंगेश भाऊ धाडगे(प्लास्टिक मुक्त संघटना) महेंद्र बाविस्कर ,(झुंजार तरुण मित्र मंडळ ) प्रज्योत सिंग हंस(संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान)मंदा मोरे,धीरज फणसे बेसिक्स झोनल इन्चार्ज,शैलेश मोरे (ह्यूमन मॅट्रिक्स टीम )आरोग्य सहायक रवींद्र गायकवाड, उमेश जाधव,आरोग्य मुकादम,सोनाली आठवा, नितीन वाघ,नंदू कानडे,भोंडवे भाऊसाहेब,नवी दिशा महिला बचत गट,सुनील धावरे,अमन बिराडे ,बेसिक्स संस्था वार्ड इन्चार्ज सह अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.