पिंपरी चिंचवड मध्ये अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धा जाहीर माजी महापौर राहूल जाधव यांच्या अभिनव उपक्रम

0
260

मुख्यमंत्री पण रिक्षाचालक शहराचे महापौर पण रिक्षाचालक

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी शारदीय नवरात्री महोत्सवा मध्ये विविध स्पर्धांचे कार्यक्रम पाहीले असतील,मात्र जाधववाडी, चिखली येथे माजी महापौर राहुल जाधव आणि त्यांच्या पत्नी मंगलाताई जाधव यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या आहेत. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पिंपरी चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव हे रिक्षाचालक होते.त्यामुळे रिक्षा व्यवसायाला सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळावी,या उद्देशाने चिखली जाधववाडी मोशी प्रभाग क्र.2 मधील सर्व रिक्षाचालकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर राहुल दादा स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने मंगलाताई जाधव यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम क्र.21 हजार द्वितीय क्र.15 हजार,तृतीय क्र. 11 हजार,चतुर्थ क्र 7 हजार आणि पाचवा क्र. साठी 5 हजार रुपायांची आणि प्रत्येक सहभागी रिक्षाचालकास ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रके जाहीर करण्यात आली आहेत.

महापौर राहुलदादा यांनी सांगितले की,सर्वसामान्य माणूस नेहमीच रिक्षातून प्रवास करीत असतात. मात्र, आपण रिक्षाकडे फक्त एक प्रवासी वाहन म्हणून पाहतो. प्रवाशांचा सुखद प्रवास व्हावा यासाठी काही हौशी रिक्षाचालक आपल्या रिक्षा अगदी कल्पकतेने सजविण्याचे काम करीत असतात.मी स्वतः रिक्षा व्यवसाय करत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे.

रिक्षा सर्वसामान्य लोकांचे या शहरातील महत्वाचे वाहन आहे.रिक्षा व्यवसायात असलेल्या सामान्य कुटुंबातील तरुणांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा,तसेच रिक्षा व्यवसायाला स्पर्धेत टिकण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.दि.28 ऑक्टोबर 2022 रोजी रामायण मैदान,जाधववाडी,टाळ गाव चिखली येथे होणाऱ्या या स्पर्धेत रिक्षाचालकांनी रिक्षा सजवून आणाव्यात.असे आवाहन राहुल जाधव यांनी केले आहे.