पिंपरी, चिंचवड, भोसरीसाठी मनसेने थोपटले दंड

0
109

पिंपरी, दि. ३० – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा करताच शहरातील तीनही मतदारसंघात मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहोे. त्याचाच एक भाग म्हणून निगडी येथील ग.दि.मा. सभागृहात कार्यकर्त्यांचे शिबीर मेळावा घेण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी, भोसरी, चिंचवड, या तिन्ही विधानसभेमधील पदाधिकारी मनसैनिकांसाठी निवडणूक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये तिन्ही विधानसभेतील सर्व पदाधिकारी, मनसैनिक, निवडणूकीस इच्छुक असलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशिक्षण धनंजय खाडिलकर निवडणूक व्यवस्थापक सल्लागार मुंबई यांनी उपस्थित सर्व मनसैनिक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी खाडिलकर यांनी निवडणूका डोळ्यासमोर न ठेवून नेहमी मतदार यादी वरती काम करावे त्यामध्ये प्रामुख्याने मतदार यादी वाचन कसे करावे, मतदार यादी कशी फोडावी, मतदार नोंदणी कशी करावी, मतदार यादीत दुबार नावे कशी शोधावी, मतदार यादीतील दिशादर्शक, प्रभागाची हद्द, या यादीमध्ये समाविष्ट असलेले मतदार कसे ओळखायचे , मतदार कोणत्या सोसायटीत, भागात राहतात ते कसे ओळखायचे, पक्षाला मानणारे मतदार, वैयक्तिक तुमचे जवळचे मतदार, व आपले विरोधातले मतदार कसे ओळखायचे या व अशा अनेक गोष्टींवर ती खाडिलकरांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले.
मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावरती हरकती कशा घ्यायच्या आपले मतदार शेजारच्या वार्डामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती कसे हरकती घेऊन त्यांना पुन्हा आपल्या मतदारसंघात समाविष्ट करण्याबाबत प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसैनिकांना प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होणार असल्याचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.

कार्यक्रमास उपशहर अध्यक्ष बाळा दानवले, राजू सावळे, विशाल मानकरी, सचिव रुपेश पटेकर, महिला सेना अध्यक्ष सीमा बेलापूरकर, विभाग अध्यक्ष चिंचवड मयूर चिंचवडे, विभाग अध्यक्ष पिंपरी दत्ता देवतारासे, विभाग अध्यक्ष भोसरी अंकुश तापकीर, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, मनविसे शहराध्यक्ष अनिकेत प्रभू, जनहित उपाध्यक्ष राजू भालेराव, मनहित शहराध्यक्ष शैलेश पाटील, संघटक विनोद भंडारी विष्णू चावरिया जयसिंग भट, अनेक पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित पाहुण्यांचे व मनसैनिकांचे स्वागत सचिन चिखले यांनी केले तसेच आभार बाळा दानवले यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहरात येणाऱ्या कालावधीमध्ये पदाधिकारी मनसैनिकांन साठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आलेले असून या ठिकाणी उपस्थित मनसैनिक, पदाधिकारी यांना कार्यक्रमाची माहिती सांगण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसे पूर्ण ताकतीने उतरणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय खेचायचा या उद्देशाने सर्व मनसैनिक व पदाधिकारी कामाला लागले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर चिंचवडे यांनी केले.