पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारला

0
312

पिंपरी,दि.१४(पीसीबी) – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलिस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. शिंदे यांना आठ महिन्यांचा कालावधी मिळाला.

अंकुश शिंदे यांची १८ एप्रिल २०२२ ला आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली होती. पदभार आता घेतल्यानंतर लगेचच त्यांनी काही पथक बरखास्त करण्यासह विविध निर्णय घेतल्याने हे चर्चेत आले होते मागील महिनाभरापासून कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कारवाईचाही त्यांनी धडका लावला होता. तसेच दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमते बाबत प्रश्न उपस्थित केले गेले. अशातच ही बदली झाली. नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर त्यांच्या जागी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौबे हे पिंपरी चिंचवडचे पाचवे आयुक्त असतील.