पिंपरी-चिंचवड पोलिसांचे सहा जुगार अड्ड्यांवर छापे, २७ जणांना अटक

0
5

दि.१( पीसीबी)-पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे.सहा ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी छापे मारत २७ जणांना अटक केली. यात कुख्यात गुंड गणपत लांडगे याचाही समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींसह ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण, दिघी, चिखली आणि हिंजवडी येथील कारवायांमध्ये २६ मोबाईल फोन, तीन कार, पाच दुचाकी असा एकूण ३४ लाख १४ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आगामी सण, उत्सव आणि निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बेकायदेशीर शस्त्र जप्तीची मोहीम सुरु केली आहे. यामध्ये आतापर्यंत १३० पेक्षा अधिक घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचसोबत अवैध धंद्यांवर देखील कारवायांची मालिका सुरु केली आहे. दारू भट्ट्या लावणे, अवैधरित्या दारूची विक्री, वाहतूक, प्रतिबंधित गुटखा विक्री, साठवणूक याबाबत पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. आता पोलिसांनी चाकण येथील तीन ठिकाणी, दिघी, चिखली आणि हिंजवडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण सहा जुगार अड्ड्यांवर छापे मारले.

या कारवाई मध्ये सराईत गुंड गणपत लांडगे याच्यासह २७ जणांना अटक करण्यात आली आहे. शुभम गणेश सांळुके (३०, विश्रांतवाडी, पुणे), मयुर सुदाम धापटे (२९, कलस, हवेली), आकाश नवनाथ चौधरी (२९, पिंपरी), हुकूमसिंग डीडीसिंग कल्याणी (३९, हडपसर), संतोष सदाशिव राखपसरे (४५, लोहगांव), उमेश सोपान प्रधान (३४, मोशी), किशोर रामचंद्र पाटोळे (४१, हडपसर), शरद काशीनाथ शेडगे (४२, महालुंगे पाडाले), मनी उर्फ जॉकी भगवान तिवारी (२८, विमाननगर), अतुल राजू देवकर (३४, विश्रांतवाडी), जालिदंर मधुकर शिंदे (४३, भोसरी), सुशांत जालिंदर पवार (२८, राख, पुरंदर), सुरेश उर्फ जॉकी किसन राठोड (३१, पिंपलेगुरव), गणपत विठ्ठल लांडगे (६२, भोसरी), दशरथ उर्फ जॉकी अमरसिंग पवार (३४, विश्रांतवाडी), अंकुश उर्फ जॉकी गोरखनाथ गायकवाड (३३, निगडी), निखिल राजू देवकर (३१, विश्रांतवाडी), गुड्डू उर्फ जॉकी रणजित रवाणी (३४, हडपसर), पवन पंडीत मौजे (३३, लोहगांव), मारुती उर्फ जॉकी ईश्वर सुरवसे (३०, मुंढवा), अतुल अमृत मोहिते (३२, आंबेठाण), प्रणय अंकुश जाधव (२०, दिघी), अक्षय गोरक्षनाथ बोकड (२६, दिघी), मंगेश कैलास भिंगारे (२३, दिघी), सुधीर हरजितरॉय नागपाल (६०, अहिल्यानगर), अन्सार साहेबलाल शेख (६४, हडपसर), वसंत नामदेव बोऱहाडे (४७, चऱहोली खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेल्यांसह निरंजन तुळशीदास मंगळवेडेकर (चिंचवड), केतन झोरे (चऱहोली बुद्रुक), रासकर आणि इतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.