पिंपरी चिंचवड टीडीआर घोटाळा प्रकरणात थांबायला सांगितले – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
519

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – टीडीआर घोटाळा प्रकरणात पाणी मुरत असल्याचे मी मागेच सांगितले होते. याच विषयावर कालच माझे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे झाले. कुठेही नुकसान होत असेल आणि आमच्या निदर्शनास आणून दिले तर राज्य सरकारला ते थांबविण्याचा अधिकार आहे. आम्ही हे प्रकरण थांबवायला सांगितले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी ते आले होते. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. टीडीआर घोट्ळायवर काय निर्णय झाला, असे पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, टीडीआर प्रकऱणात गडबड आहे, कुठेतरी पाणी मुरत असल्याचे माझ्या लक्षात आले. गेल्यावेळी मी त्यावर बोललो होतो. आता ते प्रकरणा थांबवायला सांगतिले. कालच त्याबाबत माझे आणि देवेंद्रजींचे बोलणे झाले. कुठेही संस्थेचे नुकसान होत असेल, तिथे हस्तक्षेप करायचा सरकारला अधिकार आहे. महापालिका आयुक्तांनाही गेल्यावेळी मी हिंट दिली होती. राज्याचे आताचे प्रधान सचिव नितीन करिर, दुसरे सचिव असिम गुप्ता यांच्यासह चार-पाच अधिकाऱ्यांकडे मी स्वतः त्याबाबतची माहिती घेतली. मला त्यात गडबड दिसली. आम्ही सीएमची भेट घेतोय. यापूर्वी त्यांच्याही कानावर तक्रार गेल्या आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास यांनी मला त्याबाबत सांगितले होते. मी तत्काळ चार-पाच अधिकाऱ्यांना हे प्रकऱणा तपासालया सांगितले. माहिती घेतल्यावर मला लक्षात आले इथे पाणी मुरतेय, मग त्या निर्णयाप्रत आम्ही आलोत, असे अजितदादांनी स्पष्ट केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या टीडीआर घोट्ळायात मोठा गोलमाल व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर विधीमंडळ अधिवेशनात केला होता. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट आयुक्त यांच्यावर आरोप करत त्यांना बडतर्फ कऱण्याची मागणी विधानसभेते केली होती. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपच्या आमदार अश्विनीताई जगताप, राम सातपुते तसेच शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी त्यावर ठोस भूमिका घेत चौकशिची मागणी केली होती. संभाजी ब्रिगेड संघटनेचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी नगरविकास उपसंचालक प्रसाद गायकवाड यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती. अशा प्रकारे सर्व शहरातून अडिच हजार कोटींच्या टीडीआर घोट्ळायवर राळ उठलेली असताना महापालिका आयुक्त शेखर सिंह हे त्यात काहीच गैर नसल्याचे वांरवार सांगत होते म्हणून संशयाचे धुके ग़डद झाले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांच्या पत्रावर अभिप्राय देताना या प्रकऱणाची मंजुरी तसेच टीडीआर वाटपाला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सादर कऱण्याचे आदेश नगरविकास प्रधान सचिवांना दिले होते. आता शहराचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याने टीडीआर घोटाळ्यात आयुक्त शेखर सिंह यांच्यावर शेकले आहे.