—स्वामी गोविंददेव गिरी महाराज, डॉ श्रीपाल सबनीस, श्री श्याम अग्रवाल आणि श्री रघुनाथ ढोले हे अहिंसा पुरस्काराचे मानकरी
—–पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार, अजैन आणि शाकाहारी व्यक्तींना अहिंसा पुरस्कार दिला जातो. भगवान महावीर जयंतीच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण केले जाते ,या वर्षीही महावीर जयंतीच्या दिवशी दिनांक 10 एप्रिल रोजी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. यावर्षीचे अहिंसा पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत :: अयोध्या येथील श्री राम मंदिराची प्रतिष्ठा करण्यात ज्यांचा प्रमुख सहभाग होता त्या श्री गोविंददेव गिरी महाराज यांना अध्यात्मिक क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार,, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष , महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस यांना साहित्य क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार, गेली ५० वर्षेपेक्षा जास्त काळ पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे दै आजका आनंद चे मुख्य संपादक श्री श्याम आगरवाल यांना पत्रकारिता क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार, आणि वृक्षारोपण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या श्री रघुनाथ ढोले यांना पर्यावरण क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्कार महावीर जयंतीच्या दिवशी दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रा रामकृष्ण मोरे सभागृह या ठिकाणी दिला जाणार आहे. सदर अहिंसा पुरस्कार पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्री शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे यांच्या हस्ते दिला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया असणार आहेत. अशी माहिती पुरस्कार समितीचे प्रमुख, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया आणि पुरस्कार समितीचे सदस्य नितीन बेदमुथा,प्रा प्रकाश कटारिया विलासकुमार पगारिया आणि उमेश पाटील यांनी दिली.