पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त अहिंसा सप्ताह अहिंसा रॅली अहिंसा पुरस्कार अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन

0
13

पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त दिनांक 4 एप्रिल पासून दिनांक 10 एप्रिल पर्यंत अहिंसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .आणि 10 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती च्या दिवशी, अहिंसा रॅली चा शुभारंभ आठवडे बाजार रावेत या ठिकाणाहून दुपारी साडेतीन वाजता होणार आहे आणि रॅलीचा समारोप आर एम डी स्कूल जैन विद्या प्रसारक मंडळ या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणाहून अहिंसा पदयात्रा सायंकाळी पाच वाजता निघून प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह मध्ये सायं 6 वाजता सदर पदयात्रेचा समारोप केला जाणार आहे , मोरे सभागृहामध्ये जैन संगीतरत्न मोहित भाई बारोट पालीताना, यांचा प्रभु भक्ती हा भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे .याच वेळी अहिंसा पुरस्कार आणि इतर पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. दिनांक 4 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या अहिंसा सप्ताहातील कार्यक्रम खालील प्रमाणे असणार आहेत. ———— दिनांक 4 एप्रिल रोजी कासारवाडी येथील प्यारीबाई पगारिया सभागृहामध्ये भक्तामर पठन, दुपारी बारा वाजता निगडी आकुर्डी प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या वतीने वाय सी एम हॉस्पिटल येथे आनंद की रोटी हा अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 5 एप्रिल रोजी भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर निगडी या ठिकाणी पार्श्व पद्मावती महिला मंडळ यांच्या वतीने पाककला स्पर्धा सायंकाळी चार वाजता घेण्यात येणार आहेत, सायंकाळी 5 वाजता मातोश्री वृद्धाश्रम बिजलीनगर या ठिकाणी स्वानंद महिला संस्था आणि जैन कॉन्फरन्स ,महिला विभाग यांच्या वतीने ज्येष्ठांशी संवाद व त्यांची सेवा हा कार्यक्रम होणार आहे .रात्री आठ वाजता जैन श्वेतांबर तेरापंथ सभा यांच्या वतीने तेरापंथ भवन उद्योग नगर या ठिकाणी भगवान महावीर स्वामी वर आधारित गीतिका व कविता प्रस्तुती कार्यक्रम होणार आहे .दिनांक 6 एप्रिल रोजी चिंचवडगाव जैन श्रावक संघाच्या वतीने कल्याण प्रतिष्ठान येथे सकाळी नऊ वाजता आरोग्य तपासणी शिबिर ,तसेच पिंपळे सौदागर जैन श्रावक संघाच्या वतीने रॉयल ऑरेंज काऊंटी या ठिकाणी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. दुपारी बारा वाजता महावीर की रोटी हा कार्यक्रम होणार आहे,स 9 वा पिंपळे गुरव जैन स्थानकामध्ये रक्तदान शिबिर होणार आहे, याच दिवशी दुपारी 3 वा‌. पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने मनोहर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे भक्ती गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि 7 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता जैन महासंघ आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स आणि चिंचवड स्टेशन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जैन स्थानक चिंचवड स्टेशन येथे भव्य कर्करोग तपासणी शिबिर सकाळी नऊ पासून आयोजित केले आहे. दुपारी अडीच वाजता कासारवाडी जैन स्थानक सभागृहामध्ये नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीने व्याख्यान , प्रश्न मंच आणि पुरस्कार वितरण समारोह संपन्न होणार आहे. सकाळी 11 वाजता निगडी प्राधिकरण श्रावक संघाच्या वतीने वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी येथे आनंद की रोटी हा अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे .दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता जैन महासंघाच्या वतीने ऑक्सिजन पार्क, लक्ष्मी नगर, लिंक रोड चिंचवड या ठिकाणी तीर्थंकर वाटिका हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी नऊ वाजता दापोडी जैन श्रावक संघाच्या वतीने दापोडी जैन स्थानकामध्ये जाप अनुष्ठान होणार आहे. तसेच चिंचवड स्टेशन जैन स्थानकामध्ये कर्करोग तपासणी शिबिर स 9 पासून होणार आहे. याच दिवशी दुपारी चार वाजता थेरगाव हॉस्पिटलमध्ये भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड च्या वतीने रुग्णांना खाऊ आणि फळ वाटप केले जाणार आहे. दिनांक 9 एप्रिल रोजी जितो पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने विश्व नवकार महामंत्र दिवस सकाळी सात वाजता जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवडगाव येथील मैदानावर संपन्न होणार आहे. तसेच चिंचवड स्टेशन श्रावक संघाच्या वतीनेही नवकार महामंत्र जाप आणि विहार सेवक जॅकेट वितरण सकाळी आठ ते नऊ या वेळात केले जाणार आहे. सकाळी 11 वाजता निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या वतीने सावली निवारा केंद्र, शगुन चौक, पिंपरी या ठिकाणी अन्नधान्य वाटप होणार आहे. आणि भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट निगडी यांच्या वतीने सायं 5.30 वाजता भक्ती गीताचा सांस्कृतिक कार्यक्रम, निगडी येथील दिगंबर जैन मंदिरामध्ये होणार आहे. याच दिवशी सायंकाळी सात वाजता पिंपरी चिंचवड जैन महासंघ संचलित महावीर फूड बँकेच्या वतीने धान्य वाटप कार्यक्रम त्याच ठिकाणी होणार आहे . दिनांक 10 एप्रिल भगवान महावीर जयंती च्या दिवशी चिंचवड स्टेशन जैन स्थानक या ठिकाणी जैन श्रावक संघ ,चिंचवड स्टेशन आणि जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आकुर्डी निगडी प्राधिकरण श्रावक संघाच्या वतीने सुद्धा आकुर्डी जैन स्थानकात स्थानकामध्ये रक्तदान शिबिर सकाळी नऊ वाजता आयोजित केले आहे. भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्या वतीने दिगंबर जैन मंदिर निगडी दिगंबर जैन मंदिर निगडी येथे रक्तदान, नेत्रदान दंतचिक्कीत्सा शिबिराचे आयोजन सकाळी नऊ पासून करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दुपारी साडेतीन वाजता भव्य अहिंसा रॅली, सायं पाच वाजता अहिंसा पदयात्रा, साडेसहा वाजता भक्ती संध्या कार्यक्रम, रात्री आठ वाजता अहिंसा पुरस्कार ,अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.. या सर्व कार्यक्रमांना पिंपरी चिंचवड मधील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव भव्य प्रमाणात आनंदी वातावरणात संपन्न करावा .असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष श्रेयस पगारिया, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, महामंत्री संदीप फुलफगर , उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, तुषार मुथा,प्रसिध्दी प्रमुख संदेश गदिया तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष किरणभाई शहा ,माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा , विलासकुमार पगारिया,प्रा प्रकाश कटारिया, वीरेंद्र जैन ,विरेश छाजेड धीरज नहार , हेही उपस्थित होते.