पिंपरी, दि . १४ ( पीसीबी )
पिंपरी :शहरातल्या काव्य,साहित्यिक चळवळीतली एक नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “नक्षत्राचं देणं काव्यमंच”या संस्थेला यावर्षी २५वर्षें पूर्ण होत आहेत. प्रा. कवी वादळकार राजेंद्र सोनवणे यांनी या संस्थेचे रोपटे २५ वर्षांपूर्वी लावले, त्याला आता २५वर्षें पूर्ण होत आहेत. ही खरोखरचं अभिमानाने मिरवावे अशी बाब.
या निमित्ताने येत्या दि.१७ आणि १८ मे २०२५ रोजी ‘आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यासंमेलन ‘पिंपळे गुरव, पुणे येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे आयोजित करण्यात येत आहे. सलग दोन दिवस हे महाकाव्यसंमेलन आयोजित होत आहे, ज्याच्या उदघाटनाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे उदघाटक म्हणून उपस्थित असणार आहेत. स्वागताध्यक्ष आमदार शंकरभाऊ जगताप, सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार आहेत, तर समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत. या वेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, माजी शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर,विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ,खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, कामगार नेते डॉ. कैलासभाऊ कदम,उद्योजक कृष्णकुमार गोयल,महाकाव्यसंमेलनासाठी उपस्थिती असणार आहे. भोसरी आमदार महेश लांडगे, आमदार शरद दादा सोनवणे, आमदार सुनील आण्णा शेळके, माजी आमदार अश्विनी जगतापआमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आदी मान्यवरही या महासंमेलनात उपस्थित असणार आहेत.
जेष्ठ कवी आणि गझलकार म. भा. चव्हाण या महाकाव्यसंमेलनाचे अध्यक्ष असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.
काव्य दिंडी पासून ते संस्थेच्या सभासद कवीच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, व्याख्यान ते बहारदार काव्य संमेलन आदी या महाकाव्यसंमेलनाचे खास वैशिट्ये असणार आहेत.
शनिवारी दिनांक १७ मे रोजी मनपा शाळा गणेश मंदिर ते निळू फुले सभागृह अशी काव्य ग्रंथदिंडी निघेल आणि सकाळी १०वाजता या महासंमेलनाचे उदघाटन होईल.
या महाकाव्य संमेलनासाठी राज्यभरातले कवी सहभागी होणार आहेत. त्यांना संमेलनामध्ये विनामूल्य सहभाग असून त्यांची चहा ,नाश्ता, जेवण व निवास व्यवस्था पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली आहे. प्रत्येक सहभागी ला सन्मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे अस
अशी माहिती राजेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.