पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड आयडॉल २०२२ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस गेली ६ वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला व त्यातील काही स्पर्धकांनी ‘सूर नवा ध्यास नवा’,झी सारेगमप तसेच अशा अनेक स्पर्धांमध्ये गायक म्हणून पारितोषिक मिळविले आहे. या स्पर्धे मधील अनेक स्पर्धक व्यावसायिक रंगमंचावर गायक म्हणून नाव कमवीत आहेत, अशी माहिती मुख्य संयोजकांनी दिली आहे.
गेली दोन वर्षे कोव्हीड – १९ या जागतिक महामारी मुळे सदर स्पर्धेमध्ये खंड पडला होता. परंतु आता पुन्हा एकदा नव्या दमाने आम्ही हि स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळे नवोदित कलाकारांना उर्जा मिळणार आहे. यंदाचे पिंपरी चिंचवड आयडॉल ‘मोरया करंडक’ चे हे ७ वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे फॉर्म सर्व्हे नं.१६४ “मनिषा स्मृती निवास” भोईर नगर चिंचवड येथे उपलब्ध असून फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख बुधवार ०५ जुलै २०२२ (वेळ सकाळी १० ते सायं ७.०० वा.) आहे.
या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक श्री भाऊसाहेब भोईर हे असून आयोजन हर्षवर्धन भोईर यांनी केले असून संयोजिका मानसी भाऊसाहेब भोईर- घुले आणि सुषमा बोऱ्हाडे-खटावकर या आहेत. या स्पर्धेचे संगीत संयोजन मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत ‘रजनीगंधा’ चे वादक करतील अधिक माहितीसाठी ९८२२६०७६८७ आणि ९८२२३१३०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेचा वयोगट १५ ते ३५ वर्षे असा आहे.