पिंपरी चिंचवडात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सोमवारी जनाधिकार जनता दरबार

0
242

ऑन दी स्पॉट सोडविल्या जाणार नागरिकांच्या समस्या

पिंपरी, दि. ४ (पीसीबी): राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राज्यव्यापी जनाधिकार जनता दरबार कार्यक्रम सोमवारी 5 फेब्रुवारी रोजी शहरातील खंडोबा मंदीर सभामंडप,आकुर्डी येथे होणार आहे.शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, माथाडी कामगार,व्यापारी, व्यावसायिक,विद्यार्थी,निराधार व दिव्यांग नागरिकांच्या वैयक्तिक, सामूहिक व धोरणात्मक समस्या ऑन दी स्पॉट सोडविल्या जाणार असून आपल्या तक्रारी घेऊन येण्याचे आवाहन शिवसेना पिंपरी चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे..

राज्यातील महायुती सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमातून प्रशासन सामान्य नागरिकांच्या दारी गेली असल्याचे भास निर्माण करत आहे. या कार्यक्रमातून हजारो लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असल्याची माहितीही शासन स्तरावरून देण्यात येते.परंतु प्रत्यक्षात यामाध्यमातून महायुतीचे सरकार मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करून मार्केटिंगचा खेळ खेळत असल्याने त्याच्या प्रत्युत्तरात सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी दानवे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत राज्यातील 06 जिल्हय़ात हा कार्यक्रम संपन्न झाला असून हजारो नागरिकांनी यावेळी आपल्या समस्यांची नोंद केली आहे.त्यांच्या तक्रारी स्वतः अंबादास दानवे यांनी ऐकून त्यांचे निराकरण केले आहे.

याव्यतिरिक्त जागेवर न सोडविता आलेले प्रकरण मार्गी लागावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व विविध प्रशासकीय खात्याच्या प्रमुखांशी दानवे चर्चा करणार असून संबंधित कार्यक्रम बाबतीत पत्रकारांना माहिती देणार आहे.