पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले; गाडीला भीषण अपघात

0
497

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) पुणे ते सांगली दरम्यान झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण जयसिंगपूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त शिरोटे कुटुंबिय पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. कासेगाव जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागाहून जोरदार धडक दिली. यात अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील दोघांचा घटनास्थळी तर अन्य तिघांचा रूग्णालयात नेतांना मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.