तळवडे,दि.०८ (पीसीबी)- पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आणखी काही कामगार त्यात फसल्याची सांगण्यात येत आहे. फटाका गोदामाला ही आग लागल्याची माहिती सूत्रांकडून माहिती मिळत आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे ७ ते ८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून आत्तापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.
चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी आगीमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने पोहोचली असून जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी आग लागली तिथे केकवरील फायर कँडलचा कारखाना आहे.