पिंपरी चिंचवडमध्ये ‘बिर्याणी प्रीमियर लीग’ चे आयोजन

0
429

पिंपरी,दि.२८(पीसीबी) – लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्येच क्रिकेटच क्रेझ असते . अगदी गाव खेड्यांपासून ते मोठमोठ्या शहरांमध्ये क्रिकेटचा एक वेगळा चाहतावर्ग असतो . तर काही ठिकाणी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात . तुम्ही क्रिकेटच्या अनेक स्पर्धांविषयी ऐकलं असेल पण तुम्ही कधी बिर्याणी प्रीमियर लीग बद्दल ऐकलंय का ? नाही ना ,तर अशी आगळी वेगळी स्पर्धा पिंपरी चिंचवडमध्ये एका क्रिकेटप्रेमीने भरवली .. ज्याची चर्चा सध्या शहरभर सुरु आहे .

अजय दूधभाते आणि मित्रपरिवाराने पीडब्ल्यूडी मैदान सांगवी येथे बिर्याणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं . जुन्या नव्या सगळ्या मित्रांनी एकत्र यावं ,भेटीगाठी व्हाव्यात अशा उद्देशाने हि बिर्याणी प्रीमियर लीग भरवण्यात आली . अजय दूधभाते आणि मित्रपरिवाराने वेळोवेळी या अशा स्पर्धेचं आयोजन करून अनेक गोरगरिबांना मदत देखील केली असल्याचं त्यांनी म्हटलंय . या स्पर्धेसाठी हजार रुपये एंट्री फी ठेवण्यात आली असून ३ हजाराचे बक्षीस विजयी संघाला देण्यात येणार असून सर्व खेळाडूंमध्ये बिर्याणी च वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अजय दूधभाते यांनी दिलीय . त्याचप्रमाणे खेळाडूंना काही दुखापत होऊ नये याची खबरदारी देखील घेण्यात आली .