पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रन, पत्रकाराचा मृत्यू

0
88

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) पुणे: पुण्यामध्ये अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कल्याणी नगर अपघातचा प्रसंग अजूनही डोळ्यासमोर गेलेला नाही. त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. येथे रविवारी मध्यरात्री एका भरधाव ट्रकने पती-पत्नीला उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये पतीचा जागेवरच झाला आहे, तर पत्नी गंभीर जखमी आहे. ही धडक इतकी जोरात होती की हे दांपत्य हवेत उडून खाली पडले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शरद वसंतराव गायकवाड (वय ४२) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते पत्रकार होते. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत मृतदेह पुढील कारवाईसाठी पाठवला आहे.
ट्रकची जबर धडक, पती-पत्नी हवेत उडाले अन्…

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद गायकवाड रविवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या पत्नीसोबत एका मंदिराकडून डिकॅथलोन मॉलकडे जात होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना रस्त्यावरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने या पती-पत्नीला जोराची धडक दिली. ट्रक वेगात असल्याने पती-पत्नीला जोरदार धडक बसली आणि ते दोघेही कित्येक फूट हवेत उडाले आणि खाली जमिनीवर आपटले. याघटनेत शरद गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाली आहे.