पिंपरी चिंचवडमध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
9

दि. १९ (पीसीबी) पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये भाऊसाहेब भोईर युवा मंचच्या वतीनं घरगुती गणपती बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.

शहराच्या जीवनदायिनी असणाऱ्या नद्या आणि इतर जलस्त्रोतांना हानी पोहोचू नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भाऊसाहेब भोईर युवा मंच यांच्या वतीने विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमात ऋषिकेश कुंभार, रुपेश गायकवाड, प्रदीप चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गणेश विसर्जनाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्धपणे पार पाडली. नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होत पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिले.

महानगरपालिका आणि भाऊसाहेब भोईर युवा मंच यांच्या सहकार्यामुळे शहरातील विसर्जन प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली, ज्यामुळे नद्या आणि जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यात मदत झाली.