पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवृष्टी, शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

0
252

पिंपरी दि. १३ (पीसीबी)  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे.त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळेना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत : अनुदानित) ता. १३ ते १४ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.