पिंपरी-चिंचवडमधील दोन कन्या न्यायमंदिरात!

0
13

दि. २ ( पीसीबी ) – दिघी गावच्या ॲड. स्नेहा सीताराम बोडके आणि ॲड. गौरी श्याम राउल यांनी MPSC द्वारे घेतलेल्या “प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी” (JMFC, CJJD) परीक्षेत उत्तीर्ण होत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट, अपार मेहनत, सातत्य आणि संयम यांच्या जोरावर त्यांनी हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. आमदार महेश लांडगे यांनी त्या दोघींच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनी योग्य दिशा आणि पाठबळ दिल्याने त्यांचेही आमदार लांडगे यांनी कौतुक केले. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड वकील संघटनेचे सदस्य ॲड. मंगेश खराबे उपस्थित होते.
“या दोघींचे यश पिंपरी- चिंचवड करांसाठीसाठी गौरवाची बाब आहे. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द ही नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”, असे आमदार लांडगे म्हणाले.
ॲड. स्नेहा सीताराम बोडके आणि ॲड. गौरी श्याम राउल यांना उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.