पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्ताचे नवीन अधिकृत ट्विटर हँडल

0
311

पिंपरी, दि.४ (पीसीबी) : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे नवीन अधिकृत ट्विटर हँडल पोलीस आयुक्तालयातर्फ़े जाहीर करण्यात आले आहे.

https://twitter.com/CP_PCCity असे हे ट्विटर हँडल असून शहरातील गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे आवश्यक आहे असे वाटल्याने आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांच्या समस्या थेट आयुक्तांसमोर मांडण्याची संधी यामुळे नागरिकांना मिळणार आहे. यासाठी 5 मे 2023 रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत ट ट्विटर प्रश्नोत्तर सत्र आयोजित केले आहे. नागरिकांनी त्यांची समस्या अथवा त्यांच्याकडे असलेली माहिती आयुक्तांना कळविण्यासाठी #Ask_CP_PCCity हा हॅशटॅग वापरावा असे आवाहन करण्यात आले आहे.