पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी हे भाजपचेच पाप !  अजित गव्हाणे यांचा घणाघात 

0
193

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातील 15 वर्षात पिंपरी-चिंचवडकरांना कोणत्याच संकटांना सामोरे जावे लागले नाही. कारण शहराचे पालक या नात्याने शहराच्या उत्तम नियोजनासाठी अजित पवार यांचे बारीक लक्ष असायचे. मात्र 2017 मध्ये भाजपने सत्ता काबीज केली आणि त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मुबलक पाऊस असूनही शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची वेळ येते, यापेक्षा शहरवासीयांचे दुर्दैव ते काय? नागरिकांच्या तोंडचे आणि हक्काचे पाणी पळविण्याचे हे भाजप नेत्यांचेच पाप आहे. या पापाला माफी नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला. 

रामकृष्ण मंगल कार्यालय, मोशी येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 व्या मासिक सभेत गव्हाणे बोलत होते. याप्रसंगी भाऊसाहेब भोईर, नाना काटे, रविकांत वर्पे, प्रशांत शितोळे,कविता आल्हाट, मयूर कलाटे, वसंत बोराटे, राहुल भोसले,सुनील गव्हाणे, फजल शेख, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, विनायक रणसुभे , राजेंद्र जगताप, विक्रांत लांडे, सतीश दरेकर,प्रकाश सोमवंशी,निर्मला माने, विनय शिंदे, माधव पाटील, विजय पिरंगुटे, महेश झपके, लाल महंमद चौधरी, गणेश सस्ते, युसूफ कुरेशी, अकबर मुल्ला, ऍड. विशाल जाधव, विशाल आहेर, ज्योती निंबाळकर, सारिका पवार, संगीता कोकणे, वर्षा जगताप, काशिनाथ जगताप, प्रवीण भालेकर,  कविता खराडे, धनंजय भालेकर, चंदाराणी लोखंडे, राजू लोखंडे,   भाऊसाहेब सुपे,  विजय लोखंडे, दत्तात्रय जगताप,  श्रीधर वाल्हेकर, पूर्णिमा सोनवणे, संजय अवसरमल, संजय उदावंत, सुप्रिया सौलपुरे, उत्तम आल्हाट आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना गव्हाणे म्हणाले की, प्रशस्त रस्ते, मुबलक पाणी, कचऱ्याचे नियोजन, वैद्यकीय सेवा, मनोरंजनासाठी नाट्यगृहे, उद्याने आणि इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रवादी पक्षाने सातत्याने प्रयत्न करून शहरविकासाचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला.  मात्र 2017 मध्ये शहरात सत्तापरिवर्तन झाले आणि शहराचा विकास ठप्प झाला. सत्तांध भाजप नेत्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे विकासाची दिशा भरकटून पिंपरी चिंचवडमधील सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू झाले.  या हालअपेष्टांचा हिशोब नागरिक मतांच्या रूपाने केल्याशिवाय राहणार नाही, असे गव्हाणे म्हणाले. राष्ट्रवादीने शहराचा केलेला विकास आणि भाजपने  केलेले शहर भकास हे चित्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचविण्याचे आवाहन गव्हाणे यांनी यावेळी केले.सदर बैठकीच्या निमित्ताने 8 डिसेंबर रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणाऱ्या अधिवेशनाविषयी तसेच 12 डिसेंबर रोजी शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी व बूथ कमिटी सक्षमीकरण तसेच सदस्य नोंदणी अभियानाबाबत विषयवार चर्चा करण्यात आली.

यावेळी  कविता आल्हाट, सुनील गव्हाणे, फजल शेख, विजय लोखंडे, काशिनाथ जगताप, सतीश दरेकर, रविकांत वर्पे आदींनी मनोगत व्यक्त केले. विनायक रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. वसंत बोराटे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी सेलचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक उत्तम हिरवे यांना  श्रद्धांजली वाहण्याची सूचना विनायक रणसुभे यांनी मांडली. त्याला विजय लोखंडे यांनी अनुमोदन दिले.