पिंपरी दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला केवळ 21.82 टक्के पाणीसाठा आहे. जुलैच्या पंधरवाड्यापर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. पण, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. गतवर्षी आजच्या तारखेला 29.43 टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा 7.61 टक्के पाणीसाठा कमी आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून एका दिवसाला 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
धरणात आजमितीला 21.82 टक्के पाणीसाठा आहे. जुलैच्या पंधरवाड्यापर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. 1 जून पासून पाणलोट क्षेत्रात केवळ 5 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 29.43 टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा 7.61 टक्के पाणीसाठा कमी आहे. पावसाने यंदा ओढ दिली आहे. पाऊस लांबणीवर पडला आहे. सध्या पाण्याची अडचण येणार नाही. पण, पाऊस लांबणीवर गेल्याने धरण भरायला उशीर होईल. परिणामी, पुढीलवर्षी पाण्याची अडचण होईल असे पवना धरणाचे शाखा अभियंता समिर मोरे म्हणाले.