पिंपरी गावात उघड्या दरवाजावाटे 13 लाखांची रोकड लंपास

0
71

पिंपरी, दि. 14 जुलै (पीसीबी) – पिंपरी गावात अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करत 13 लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 12 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. गणेश ज्ञानेश्वर खराडे (वय 48, रा. खराडे वाडा, पिंपरी गाव, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खराडे यांच्या घरात 9 जुलै ते 12 जुलै या कालावधीत अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. घरातून 13 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 12 जुलै रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.