पिंपरी गावात अग्निहोत्र सोहळा संपन्न

0
332

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – : पिंपरी गावामध्ये विश्व फाऊंडेशन व स्वा.सै.निवृत्ती वाळुंजकर प्रतिष्ठाण आयोजित श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापणा अभियान अंतर्गत सामूहिक अग्निहोत्र सोहळा संपन्न झाला, सोहळ्यामध्ये ७३० हुन अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.

अग्निहोत्र एक वैदिक यज्ञ आहे, या यज्ञामुळे हवेतील प्रदूषण कमी होते, तसेच कमी वेळात हा यज्ञ होतो, याच भस्मचा वापर खत म्हणून कृषी आणि वनस्पती क्षेत्रात केला जातो.अग्निहोत्र सुर्यदय आणि सूर्यास्त या वेळेतच केला जातो, अग्निहोत्र केल्याने नकारात्मक ऊर्जा दुरावते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, शारीरिक आणि मानसिक स्वास्थमध्ये सुधारणा होते अश्या अनेक गोष्टीचा लाभ नागरिकांना व्हावा म्हणून निःशुल्क सेवाभावी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तसेच विश्व फौंडेशन अध्यक्ष, शिवपुरी अक्कलकोट परमसद्गुरू डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, गुरुवर्य सद्गुरू माऊली महाराज वाळुंजकर प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते, तसेच प्रसाद पालेकर जी, पवन कुलकर्णी जी, वक्रतुंड औरंगाबादकर जी, स्वा.सै.निवृत्ती वाळुंजकर अध्यक्ष गौरव वाळुंजकर, संतोष ढवळे, माऊली पवार, चैतन्य देवकर, साहिल वाळुंजकर, दर्शन वाळुंजकर, ओम कारेकर, मधुरेश वाळुंजकर, ओंकार हरमलकर, रवींद्र शिलवंत, गणेश वाणी, इत्यादी सदस्य उपस्थित होते.