पिंपरी कॅम्पात अतिक्रमण कारवाईमुळे वादावादी, व्यापा-यांनी केली दुकाने बंद

0
317

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात अतिक्रम कारवाईवेळी व्यापारी आणि अतिक्रमण पथकाच्या अधिका-यांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. दरम्यान, व्यापा-यांनी दुकाने बंद करत कारवाईचा निषेध केला.

पिंपरी कॅम्प ही शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कॅम्पातील अतिक्रमणाबाबत सातत्याने तक्रारी असतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण पथक आज गुरुवारी कारवाईसाठी कॅम्पात दाखल झाले. कारवाईदरम्यान व्यापारी आणि अतिक्रमण पथकातील अधिका-यांमध्ये काही कारणामुळे वादावादी झाले. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. व्यापा-यांनी दुकाने बंद करुन कारवाईचा निषेध केला. शगुन चौकात एकत्र येत व्यापा-यांनी कारवाई विरोधात आंदोलन केले.

दरम्यान, पोलीसही कॅम्पात दाखल झाले आहेत. माजी नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, माजी नगरसेवक डब्बू आसवाणी, पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी तिथे दाखल झाले आहेत.