पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघासाठी मा.मन्वेशसिंग सिध्दू (भा.प्र.से) यांची जनरल निरिक्षक म्हणून नियुक्ती

0
88

पिंपरी, दि. 29 (पीसीबी) : २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक जनरल निरीक्षक म्हणून मा.मन्वेशसिंग सिध्दू (भा.प्र.से) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अर्चना यादव यांनी दिली.

सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या मा.मन्वेशसिंग सिध्दू (भा.प्र.से) निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, क्वीन्सगार्डन रोड, ट्राफिक पोलीस चौक पुणे असा आहे. संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९२७००५१२०६ हा असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५१४८८६ असा आहे. तसेच निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री. मुकुंद पवार असून त्यांचा संपर्क क्रमांक ८००७२००५८५ असा आहे.

जनरल निरीक्षक पिंपरी विधानसभा मतदार संघ यांना व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, पुणे येथे भेटण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही पिंपरी(अ.जा) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

दरम्यान, आज मा.मन्वेशसिंग सिध्दू (भा.प्र.से) यांनी पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन स्विकारण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली.