पिंपरीत स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

0
502

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी मधील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा मारला. त्यात दोन महिलांची सुटका करून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली.

राहुल माने (वय 37), सुभाष प्रयाग जाधव (वय 22, रा. हिंजवडी. मूळ रा. झारखंड), जय ठकसेन लांडगे (वय 24, रा. हिंजवडी. मूळ रा. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष आणि जय या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 22 आणि 29 वर्षीय मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. वेश्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करून त्यांना ग्राहक मिळवून देत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. हा प्रकार पिंपरी मधील डिलक्स मॉलच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या ईलाईट स्पा सेंटरमध्ये सुरु होता. स्पा सेंटरच्या नावाखाली आरोपींनी वेश्या व्यवसाय चालवला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. दोघांना अटक करून दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.