पिंपरीत मोबाइल शॉपीला आग

0
136

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) : मोबाइल शॉपीला आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) पहाटे दोन वाजताच्या सुमारास शगुन चौक, पिंपरी येथे घडली.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास पिंपरीतील शगुन चौकात असलेल्या प्रीतम मोबाइल या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशामक मुख्यालयातून आगीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. दुकानाचे शटर उचकटून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता अग्निशामक दलाच्या सूत्रांनी व्यक्त केली.


ही कामगिरी अग्निशामक दलाचे पीएसओ चंद्रशेखर घुले, लीडिंग फायरमन सारंग मंगरुळकर, रुपेश जाधव, चालक केतन औसरमल, ट्रेनी फायरमन उचाले स्वप्नील, राज शेडगे, किरण राठोड, अनिकेत गोडसे, कौस्तुभ जाधव, आविष्कार लावंड, रतन जाधव यांच्या पथकाने केली.