पिंपरीत जागतिक महिला दिन उत्साहात

0
4

दि.०९(पीसीबी)-केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टच्या पिंपरी विभाग व काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम केएमटी इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडला.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून जीवन मार्गदर्शक, समुपदेशक व उद्योजिका डॉ. मीनू भोसले उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत, आत्मविश्वास वाढविण्याबाबत तसेच काम आणि कुटुंब यामधील समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या क्षमतेची जाणीव ठेवून समाजात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील जंगम यांनी केले. यावेळी सायली तापकीर , पायल थोरात, डॉ. बबिता अग्रवाल, शारदा पवार, अर्चना विश्वकर्मा व ऐश्वर्या बागल यांनी मनोगत व्यक्त करत महिलांच्या प्रगती व सक्षमीकरणाविषयी आपले विचार मांडले.

या कार्यक्रमास परिसरातील महिला केमिस्ट व फार्मासिस्ट यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. उपस्थित महिलांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष व काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांच्या पुढाकाराने करण्यात आले