पिंपरीत कार चालकास लुटले

0
228

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी मधील महेशनगर येथे कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला मारहाण करून लुटले. ही घटना रविवारी (दि. १) मध्यरात्री घडली.

गणेश विश्वकर्मा (वय २७), शुभम जाधव (वय २८), निलेश पाटोळे (वय २७, सर्व रा. महेशनगर, पिंपरी), एक अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मायकल डॉमनिक फर्नांडिस (वय २७, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कारमध्ये बसले असताना आरोपी दुचाकीवरून आले. दुचाकी कारला आडवी लावून फर्नांडिस यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि मोबाईल फोन असा ८५ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच एका कारच्या काचा फोडून आरोपींनी नुकसान केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.