पिंपरीतील डी. वाय. पाटील रूग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा ई- मेल

0
55

पिंपरी, दि. 06 (पीसीबी) : पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये बॉम्ब असल्याचा ई- मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी साधारण साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालय प्रशासनाकडे अज्ञात व्यक्तीने बॉम्ब ठेवण्याचा मेल प्राप्त झाला. यानंतर त्याची माहिती प्रशासनाने स्थानिक पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पिंपरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश आटवे हे घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर लगेच बॉम्ब शोधक व नाशक पथक, तसेच श्वान पथक देखील दाखल झाले आहे. त्यानुसार शोध मोहीम सुरू आहे.

पुण्यातील दोन हॉस्पिटल मध्ये देखील बॉम्ब ठेवल्याचा ई- मेल आल्याची माहिती मिळत आहे. मेल मध्ये म्हटल्याप्रमाणे महाविद्यालयाच्या हॉटेलमध्ये एका हिरव्या बॅगच्या पिशवीमध्ये बॉम्ब ठेवला आहे.