पिंपरीतील एका व्यापाऱ्याला खंडणीची मागणी

0
281

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरीतील एका व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका जणाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी प्रदीप अशोककुमार मोटवानी (वय ३७, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश शिरसाठ (वय ३०, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेशने फिर्यादी प्रदीप यांच्या दुकानात येऊन दरमहा १ हजार ५०० रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास व्यावयास बंद पाडू अशी धमकी देत शिवीगाळ केली. एवढेच नाही तर आरोपींने इतर दोन दुकानमालकांशी संपर्क साधून खंडणीची मागणी केली. याप्रकरणी गणेश यांच्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.